शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसासोबतच विविध रंगी छत्र्या, रेनकोटचेही बाजारात आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:53 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील विविध दालने गजबजून गेली आहे. 

ठळक मुद्दे विविध रंगी छत्र्या रेनकोटने बाजारपेठे गजबजली लहान मुले, महिलांसाठी आकर्षक छत्र्या

नाशिक : शहरात कोरोनाने सारे काही ठप्प झाले असले तरी पाऊसरूपी निसर्ग त्याच्या निर्धारित वेळेला अर्थात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला आहे. दरम्यान, सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आल्याने पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील विविध दालने गजबजून गेली आहे. गत वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचे अंदाज वर्तवण्यात आल्याने मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या छत्री, रेनकोट यांसह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग पकडणार आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने मार्केटमध्ये नवीन व्हरायटी असलेल्या वस्तू दाखल झाल्या आहेत. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लॅस्टिक पेपर आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची काही प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. रेनकोटची स्वतंत्र दालने नागरिकांना खुणावू लागली आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रेनकोटमध्ये यंदा कार्टूनची प्रिंट असलेल्या रेनकोटची भर पडली आहे. 

तीन घडीच्या छत्र्या दाखलपुरुषांच्या बहुतांश छत्र्या एकच घडीच्या असतात. आता मात्र त्यात बदल होऊन तीन घडी करून अगदी लहान आकार होणाºया छत्र्यादेखील दाखल झाल्या आहेत. अशा लहान छत्र्यादेखील यंदाचे आकर्षण राहणार आहे. तसेच महिलांच्या रंगीबेरंगी आणि बालकांच्या कार्टुन्सच्या चित्रांनी सजलेल्या छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

बालकांसाठी कार्टून रेनकोटलहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्सदेखील मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. त्यात डोरेमॉन, स्पायडर मॅन, बेन टेन, नोबिता अशा विविध कार्टून्सची चित्र असलेल्या रेनकोट्सचे आकर्षण मुलांमध्ये असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर छोटा भीम, शक्तिमान यांसारख्या सुपर हिरोंच्या रेनकोट्सनादेखील बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकMarketबाजारShoppingखरेदीconsumerग्राहक