पिंपळगाव लेप : परिसरात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा, हरभरा आदी पिके दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांला झपाटून सोडले आहे. यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कांद्याचे रोपे तसेच सोयबीन आदीसारख्या पिके उदध्वस्त केली.भरमसाट खर्च करूनही लावलेले पैसे निघणे अवघड असतानाही बळीराजा रब्बी हंगामातील पिके उभे करण्यासाठी तयारीला लागला आहे. त्यासाठी लागणारे भांडवल नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. तशातच जिद्द बाळगून कांदा, हरभरा तसेच गव्हाचे पीक उभे केले आहे; परंतु दर १५ दिवसाला ढगाळ वातावरण व आवकाळी पाऊस येत असल्याने औषधांची फवारणी करू-करू खर्च वाढू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकरी वर्गात औषधे फवारणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:20 IST
पिंपळगाव लेप : परिसरात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे तोंडचे पाणी पळाले आहे. कांदा, हरभरा आदी पिके दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांला झपाटून सोडले आहे. यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कांद्याचे रोपे तसेच सोयबीन आदीसारख्या पिके उदध्वस्त केली.
शेतकरी वर्गात औषधे फवारणीची लगबग
ठळक मुद्देतीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे चिंता