शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

इगतपुरी तालुक्यात दुरुस्तीच्या कामांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:23 PM

मान्सूनचे आगमन झाल्याने इगतपुरीतील ग्रामीण भागासह देवगाव येथे दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लॅस्टिक, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामांना बळीराजा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआला पावसाळा : डागडुजी, प्लॅस्टिक, ताडपत्री, वैरण भरण्यास प्राधान्य; कृषी विभागातर्फे उगवण क्षमतेवर मार्गदर्शन

देवगाव : मान्सूनचे आगमन झाल्याने इगतपुरीतील ग्रामीण भागासह देवगाव येथे दुरुस्तीच्या कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लॅस्टिक, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामांना बळीराजा प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी मातीची घरे व जनावरांचा चारा खराब होऊ नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर करतात. एक दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वारा, वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांमध्ये कामांची चढाओढ सुरू झाली आहे. घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लॅस्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.जोरदार पाऊस येण्यापूर्वी वेळेत घरांची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करत आहेत. तसेच पावसाळ्यात जनावरांचा चारा भिजू नये म्हणून जनावरांच्या गोठ्याची व्यवस्था ताडपत्रीच्या साहाय्याने करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले असून, छतावरील गळत असलेल्या ठिकाणांवर प्लॅस्टिकचे आच्छादन ठेवण्याचे काम जोरात चालू आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी