आम्हालाही रस्त्यावर बसण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:19+5:302021-01-08T04:43:19+5:30

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी रथचक्र चौक आणि बापू बंगलासह वडाळा-पाथर्डी रस्त्यावर अनधिकृत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असे ...

Allow us to sit on the street too | आम्हालाही रस्त्यावर बसण्याची परवानगी द्या

आम्हालाही रस्त्यावर बसण्याची परवानगी द्या

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी रथचक्र चौक आणि बापू बंगलासह वडाळा-पाथर्डी रस्त्यावर अनधिकृत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असे त्याची दखल घेत महापालिकेने कलानगर येथे कृष्णकांत भाजीबाजार बांधून दिला. यामध्ये सुमारे शंभर विक्रेते बसण्याची सोय करून देण्यात आली. भाजी विक्रेत्यांना ओट्याचे वाटप करण्यात आले; परंतु बापू बंगला बस थांबा ते सराफनगर, वडाळा-पाथर्डी रस्त्यादरम्यान दुतर्फा अनधिकृतपणे रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे ग्राहक कृष्णकांत भाजीबाजारात येत नाही. भाजीबाजारातील विक्रेते दररोज महापालिकेला कर स्वरूपात पैसे देऊन पावती फाडतात. पण रस्त्यावर ठिकठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे भाजीबाजारातील विक्रेत्यांचा व्यवसाय होत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. रस्त्यावर अनधिकृत भाजी विक्रेत्यांना भाजीबाजारात बसण्याची सक्ती करावी, अन्यथा आम्हालाही रस्त्यावर भाजी विकण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहे. निवेदनावर कोमल परदेशी, रवि आव्हाड, शुभम वाडीले, सुवर्णा बागडे, चंद्रकांत सर्जेराव, अर्चना धांडे, लक्ष्मी कासारे, प्रमोद शिवदे, किशोर वाघ, लक्ष्मी मांडे आदी विक्रेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Allow us to sit on the street too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.