शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

विद्यार्थ्यांचे लसीकरण करून शाळा उघडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:44 IST

दिंडोरी : जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कोरोनामुक्त गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे करण्यात आली.

ठळक मुद्देदिंडोरी : शिक्षक संघाचे दिंडोरी तहसीलदारांना निवेदन

दिंडोरी : जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कोरोनामुक्त गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे करण्यात आली.दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे, सरचिटणीस योगेश बच्छाव, कोषाध्यक्ष मधुकर आहेर यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले.शिक्षण विभागामार्फत ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स - सेतू अभ्यासक्रम उपक्रम सुरू असून विद्‌यार्थी शाळेत नसल्याने हा उपक्रम राबवताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील मुलांना ऑफलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही व मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरू होणे आवश्यक आहे. सर्व शिक्षक शाळेवर दररोज उपस्थित राहत आहेत. मात्र विद्यार्थीच नसल्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया घडण्यात अडथळे येत आहेत.त्यामुळे शासनाने सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करून कोरोनामुक्त गावांमधील शाळा आवश्यक नियम घालून देऊन तात्काळ सुरू करण्याचे लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी विद्यार्थी व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम विमा संरक्षण देखील देण्यात यावे, अशीही मागणी नोंदविण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी, शासनदरबारी याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी निवेदन देताना तालुका संपर्क प्रमुख कल्याण कुडके, दिंडोरी पतसंस्था उपाध्यक्ष विलास पेलमहाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा