मायकोतर्फे शालेय साहित्याचे वाटप
By Admin | Updated: September 5, 2015 00:01 IST2015-09-04T23:59:37+5:302015-09-05T00:01:13+5:30
मायकोतर्फे शालेय साहित्याचे वाटप

मायकोतर्फे शालेय साहित्याचे वाटप
सातपूर : येथील मायको एम्प्लॉईज फोरम या सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या अंध विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि पेन ड्राईव्हचे वाटप करण्यात आले.
ब्लाइन्ड वेल्फेअर आॅर्गनायझेशन या संस्थेत शिक्षण घेऊन इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारे शालेय साहित्य वाटप बॉश कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अलेक्झांडर क्लोनझिस्की व युटा अलेक्झांडर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सपकाळ नॉलेज हबचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ उपस्थित होते. मायको एम्प्लॉईज फोरम या सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती कागदी यांनी दिली. (वार्ताहर)