निरीक्षण बालगृहात शालेय साहित्य वाटप

By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:33:26+5:302014-07-14T00:29:40+5:30

निरीक्षण बालगृहात शालेय साहित्य वाटप

Allotment of School Literature in Children's Studies | निरीक्षण बालगृहात शालेय साहित्य वाटप

निरीक्षण बालगृहात शालेय साहित्य वाटप

नाशिक : उंटवाडी रोडवरील मुलांच्या शासकीय बाल निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांना नाशिक नवनिर्मिती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरीक्षणगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह होते.
बाल निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष संदीप धात्रक यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके, वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. चंदुलाल शाह यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी बर्गे, सचिव नितीन कोळेकर, अ‍ॅड. अमोल घुगे, गणेश बाणाईतकर, अ‍ॅड. हर्षल पुराणिक, भूषण अहिरे, कल्पेश जैन, सचिन ताजणे, चंद्रकांत बांडे, कुमार कडलग आदिंसह संस्थेचे सभासद उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Allotment of School Literature in Children's Studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.