शिवमल्हार मंडळाकडून घोटीत सॅनेटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 16:19 IST2020-03-22T16:18:30+5:302020-03-22T16:19:13+5:30
घोटी : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रामरावनगर येथील शिवमल्हार मित्र मंडळाच्या वतीने स्वच्छतेचे महत्व पटवून जनजागृती करण्यासोबतच शहरातील १३०० कुटूंबांना सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले.

शिवमल्हार मंडळाकडून घोटीत सॅनेटायझरचे वाटप
घोटी शहरातील रामरावनगरात मंडळाच्या वतीने जनजागृतीबरोबरच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या यांनी कुटूंबांना हात धुण्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच कोरोना विषाणूबाबत कशी सावधगिरी बाळगावी याविषयी घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवमल्हार मित्र मंडळाचे संस्थापक तसेच माजी पंचायत समीती सदस्य संतोष दगडे, अॅड. सागर वालझाडे, संदिप डावखर, डॉ. कैलास गायकर, संतोष भटाटे, अनिल पालवे, कमलाकर धोंगडे, अशरफ शेख, कैलास त्रिभुवन, संतोष काळे , योगेश शिरसाठ, प्रशांत केदार, किरण सोनवणे, सचिन ठाकरे, सुधाकर दुर्गूडे आदिंसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.