नामपूरच्या अलई विद्यालयात शालेपयोगी साहित्याचे वाटप
By Admin | Updated: July 17, 2014 00:54 IST2014-07-14T21:59:40+5:302014-07-17T00:54:03+5:30
नामपूरच्या अलई विद्यालयात शालेपयोगी साहित्याचे वाटप

नामपूरच्या अलई विद्यालयात शालेपयोगी साहित्याचे वाटप
नामपूर : येथील आर. एम. अे. विद्यालयातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके आदि शालेपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष सुनील अलई होते. उन्नती एज्युकेशन सोसायटी नाशिकच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी हेरून त्यांना मदतीचा हात देण्यात आला. डॉ. निनाद जोशी, भामरे ट्रेडर्स, युवराज निकम, नितीन नेर, गणेश छाजेड, सुरेंद्र वाघ, दिलीप मैद, संदीप खानकरी, प्रवीण खुटाडे, पप्पू मैद, सुरेंद्र खुटाडे, ताराचंद मुनोत, वासुदेव नागमोती आदिंनी या विद्यालयातील गरजू, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारून दिला.
यावेळी मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांनी विद्यार्थ्यांनी संगणकीय क्षेत्रात भरपूर ज्ञान मिळवून नवीन शैक्षणिक आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन केले. संस्थेचे संस्थापक अॅड. विनय जायखेडकर, श्रीपत कोठावदे यांच्या कार्याचा आढावा सु. शि. येवला यांनी सादर केला. अलई यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. संस्थेच्या तळेगाव येथील शाखेतही विविध कार्यक्रम घेण्यात आले. (वार्ताहर)
पाण्याचा अपव्यय सुरूच
नाशिक : शहरात पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाही इंदिरानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाकडे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.