पेठ तालुक्यातील गावांना मत्स्यबीज वाटप
By Admin | Updated: September 2, 2016 22:34 IST2016-09-02T22:34:21+5:302016-09-02T22:34:34+5:30
पेठ तालुक्यातील गावांना मत्स्यबीज वाटप

पेठ तालुक्यातील गावांना मत्स्यबीज वाटप
पेठ : पेसा योजनेंतर्गत लघु प्रकल्प तलावात मत्स्य उत्पादन करण्यासाठी पेठमधील १३ गावांना मत्स्यबीज वाटप करण्यात आले.
करंजवण येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्राकडून जवळपास ७२ हजार मत्सबीजाचे गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांच्या हस्ते जुनोठी, पहुचीबारी, दोनावडे, रुईपेठा, निरगुडे, सावळघाट, घनशेत, उस्थळे, कुंभाळे, धोंडमाळ, हरणगाव आदि ग्रामपंचायतींना मत्स्यबीज वाटप करून जवळच्या तलावात सोडण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम, सहायक गटविकास अधिकारी एस. आर. तांबेकर, विस्तार अधिकारी बी. एस. पवार, सादवे, पाडवी यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)