पूरग्रस्तांना भरपाईचे धनादेश वाटप
By Admin | Updated: September 20, 2016 01:16 IST2016-09-20T01:15:21+5:302016-09-20T01:16:29+5:30
पूरग्रस्तांना भरपाईचे धनादेश वाटप

पूरग्रस्तांना भरपाईचे धनादेश वाटप
नाशिकरोड : दीड महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त रहिवासी, दुकानदार आदिंना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. मुसळधार पावसामुळे देवी चौक, नवले चाळ, सानेगुरूजी नगर, पेंढारकर कॉलनी आदि परिसरांत पावसाचे पाणी साचून रहिवासी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना प्रत्येकी तीन हजार २०० रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वाटप आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)