हरसूल येथे आदिवासींना जातीच्या दाखल्याचे वाटप
By Admin | Updated: June 1, 2014 00:48 IST2014-05-31T21:43:04+5:302014-06-01T00:48:10+5:30
हरसूल : जातीच्या दाखल्याचे मोफत घरपोच वाटप आमदार निर्मला गावित या देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत करत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेंद्र बहिरम, देवमोगरा संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित, माजी समाज कल्याण सभापती हिरामण खोसकर, भिवा पाटील, मंगळू निंबारे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाटील, देवीदास जाधव, लक्ष्मण कनोजे, पांडुरंग काकड आदि प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तर अत्यंत जीर्ण झालेले तसेच हरविलेले रेशनकार्ड पुन्हा नव्याने मिळावे यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत शिबिर घेणार असून, गरजूंना ते मोफत घरपोच देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांनी जाहीर करत हरसूल येथील कार्यालयात १००१ जातीचे दाखले गावानुस्

हरसूल येथे आदिवासींना जातीच्या दाखल्याचे वाटप
हरसूल : जातीच्या दाखल्याचे मोफत घरपोच वाटप आमदार निर्मला गावित या देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत करत आहेत. हा एक चांगला उपक्रम आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी केले. यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार नरेंद्र बहिरम, देवमोगरा संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित, माजी समाज कल्याण सभापती हिरामण खोसकर, भिवा पाटील, मंगळू निंबारे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण पाटील, देवीदास जाधव, लक्ष्मण कनोजे, पांडुरंग काकड आदि प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तर अत्यंत जीर्ण झालेले तसेच हरविलेले रेशनकार्ड पुन्हा नव्याने मिळावे यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेमार्फत शिबिर घेणार असून, गरजूंना ते मोफत घरपोच देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांनी जाहीर करत हरसूल येथील कार्यालयात १००१ जातीचे दाखले गावानुसार तयार असून, ज्यांना त्वरित गरज असेल त्यांनी घेऊन जाणे व राहिलेले दाखले विनामोबदला घरपोच वाटप करणार असल्याचे जाहीर केले.
मोफत दाखले व नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी तसेच नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवण्यासाठी यावेळी तहसीलदार नरेंद्र बहिरम यांनी मार्गदर्शन केले.
मोफत जातीचे दाखले वाटप करण्यासाठी देवमोगरा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हर्षल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश भोये, काशीनाथ निंदे, किरण तरवारे, पुंडलीक कनोजे, दिलीप तरवारे, वैजल बाबा, जगन गोराळे हरी पवार आदि उपस्थित होते.