मुक्त विद्यापीठाने फसवणूक केल्याचा आरोप

By Admin | Updated: July 18, 2014 00:38 IST2014-07-17T23:31:02+5:302014-07-18T00:38:39+5:30

मुक्त विद्यापीठाने फसवणूक केल्याचा आरोप

Allegations of cheating by the Open University | मुक्त विद्यापीठाने फसवणूक केल्याचा आरोप

मुक्त विद्यापीठाने फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी संपादित केलेल्या गोवर्धन शिवारातील जमिनीच्या वहिवाटदारांना विद्यापीठात स्थायी नोकरीत सामावून घेणार असल्याचे विद्यापीठाने केवळ आश्वासन दिले असून, आमची फसवणूक केल्याचा आरोप वहिवाटदारांच्या वारसांनी केला
आहे. याबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन केले जाणार आहे. २५ वर्षे उलटूनदेखील विद्यापीठाने एकाही वारसाला नोकरीत सामावून घेतले नसल्याने विद्यापीठ प्रशासनाचा व शासनाचा निषेध करण्यासाठी गोवर्धन ग्रामस्थांकडून येत्या १८ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण व १९ जुलै रोजी धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Allegations of cheating by the Open University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.