पिंपळगावी वशिलेबाजीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:41+5:302021-07-09T04:10:41+5:30
१८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्या तुलनेत लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी मारामारी ...

पिंपळगावी वशिलेबाजीचा आरोप
१८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्या तुलनेत लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी मारामारी आहे. लसीकरणासाठी ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ म्हणजे लसीकरण केंद्र, वेळ याची पूर्वनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेली ही उपाययोजना निष्फळ ठरली. लसीकरण केंद्रावर एकाच वेळी २५० ते ३०० लोकांची गर्दी होतच आहे. त्यामुळे ‘अपॉइंटमेंट स्लॉट’चा काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना लसीची मात्रा घेण्यासाठी पिंपळगावी लसीकरण केंद्राकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी, लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळत असून, शारीरिक अंतर नियमाचा संपूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
कोट....
पिंपळगावच्या आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरणाचा मोठा सावळा गोंधळ सुरू असून, प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रांगेत असलेल्यांना नाही, तर रांगेच्या बाहेरील नागरिकांना वशिलेबाजी करून आर्थिक तडजोड करून लसीकरण केले जात आहे.
- अमोल कावळे,
नागरिक पिंपळगाव बसवंत
080721\1657-img-20210708-wa0018.jpg
पिंपळगाव आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झालेली गर्दी