शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:30 IST

वीजग्राहकांच्या अडीअडचणींसह महावितरणने दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावरील ग्राहकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत महावितरणने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ग्राहकांना विद्युत पुरवठा करताना येणाऱ्या अडचणींसह वीजगळती, वीजचोरी आदी बाबींमुळे तोटा होत असल्याचे सादरीकरण केले.

नाशिक : वीजग्राहकांच्या अडीअडचणींसह महावितरणने दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावरील ग्राहकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत महावितरणने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ग्राहकांना विद्युत पुरवठा करताना येणाऱ्या अडचणींसह वीजगळती, वीजचोरी आदी बाबींमुळे तोटा होत असल्याचे सादरीकरण केले. परंतु, त्यानंतर अंबड, सातपूरसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व घरगुती ग्राहकांच्या बाजूने महावितरणचा ढिसाळ कारभार, अवाजवी खर्च, चुकीच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे सादर करण्यास आयोगाने मनाई केल्यामुळे ग्राहकांनी आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करीत सुनावणीवरही बहिष्कार टाकल्याने काही काळ गोंधळ उडाला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे सचिव अभिजित देशपांडे यांच्यासह सदस्य आय. एम. बोहरी व मुकेश खुल्लर यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. आयोगाने महावितरणला त्यांची संपूर्ण बाजू मांडण्याची संधी दिली, परंतु ग्राहकांना मात्र मनाई केल्याचा आरोप करतानाच ग्राहकांची बाजू ऐकून आणि समजून घ्यायचीच नसेल तर सुनावणीचा दिखावा कशाला, असा संतप्त सवाल आयमा, निमा संस्थांसह ग्राहक पंचायतीसारख्या संस्थांसोबतच विभागातील विविध ग्राहकांनी उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ वाढल्याने आयोगाच्या पदाधिकाºयांनी अशाप्रकारे पॉवर पॉइंटद्वारे प्रेझेंटेशन करता येणार नाही. त्यासाठी मुंबई येथील मुख्यालयातच यावे लागेल. गोंधळ घालण्यात काही अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ग्राहक सुनावणीवर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर पडले. काही काळ सुनावणीत खंड पडल्यानंतर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींच्या मध्यस्थीतून सुनावणी पुन्हा सुरू करण्यात आली असता उद्योजकांसह शेतकरी व घरगुती ग्राहकांनीही महावितरच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. उत्तर महाराष्ट्रातील ग्राहकांची बाजू मांडताना सतीश शाह व धनंजय बेळे यांच्यासह अ‍ॅड. मनोज चव्हाण, श्रीकृष्ण शिरोडे, अहमदनगरचे रविकांत शेळके, मालेगावचे युसुफ शेख, अजय बाहेती, जगन्नाथ नाठे, हरिश मारू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, डॉ. गिरीश मोहिते, प्रा. अशोक सोनवणे आदींनी उद्योग, व्यावसाय, शेती व घरगुती वीज वापराच्या संदर्भात येणाºया संस्थांचा पाढा वाचतानाच प्रथम सेवा सुधारा, कार्यपद्धतीत बदल करा आणि नंतर दरवाढीच्या प्रस्तावास मान्यता द्या, असे आवाहन आयोगाला केले.उत्तर महाराष्ट्रातील उद्योग संकटातराज्यातील वेगवेगळ्या विभागातील औद्योगिक क्षेत्रात विजेचे दर वेगवेगळे असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक दर आकारले जात आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्योग संकटात आले असून, अशीच परिस्थिती कायम राहिली तर येथील उद्योग मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतील, अशी भूमिका उद्योजकांनी मांडली. शेजारी राज्यांमध्ये उत्पादित मालाच्या तुलनेत नाशिकच्या वीजदरामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे ग्राहकांनी आयोगाच्या लक्षात आणून दिले.दहा पैसे वीज दरवाढ करावी : वीज वितरण कंपनी आणि वीज नियामक आयोगाने ग्राहकांसमोर ९८ पैसे प्रतियुनिट वीज दरवाढ मिळावी अशी मागणी केली आहे, या ऐवजी ही दरवाढ दहा टक्के अर्थात १० पैसे प्रति युनिट इतकीच असावी, कारण वीज ग्राहक म्हणून मला वीज निर्मिती ते वीज वितरण, बिलिंग या टप्प्यात प्रशासनाने अद्यापही पारदर्शक कामाची प्रणाली स्वीकारलेली दिसत नसल्याचे रवी अमृतकर यांनी दिलेल्या निवदनात नमूद करण्यात आले आहे.पुढील वर्षी दरवाढ नाही : महावितरणमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेला वीज दरवाढ प्रस्ताव योग्यच असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ करिता प्रस्तावित सरासरी पुरवठा आकाराची (७.७४ रु पये प्रतियुनिट) तुलना आयोगाने मंजूर केलेल्या सरासरी पुरवठा आकाराशी (६.७१ रु पये प्रतियुनिट) केली असता ही दरवाढ १५ टक्के होते, असे नमूद करतानाच पुढील वर्षी दरवाढ करणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.पारदर्शकता आणावीवीज निर्मिती ते वीज वितरण, बिलिंग या टप्प्यात प्रशासनाने अद्यापही पारदर्शकता आणलेली नाही. शेतकºयांना दिली जाणारी कृषिपंपाची वीज सरकारी नियम निर्णयाप्रमाणे मोफत द्यायची असली तरी तिचे आॅडिट आणि मोजमाप होणे आवश्यक आहे. सध्या हे मोजमाप होत नसल्यामुळे शेतकºयांच्या नावाने मोफत वीज देण्याच्या धोरणाने वीज खरेदी ते वीज वितरण या विविध टप्प्यातील प्रक्रि येत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. तसेच आॅगस्ट महिन्यातही दुष्काळ असलेल्या गावात पिण्याचे पाणीही नसताना कृषीपंपांना सरासरी वीज बिल आकारण्यात येत असून, महावितरणने हा अंदाधुंद कारभार बंद करू मीटरप्रमाणे वीज बिल आकारावे, अशी मागणी ग्राहकांनी केली.

टॅग्स :electricityवीज