सिंहस्थाची सर्व कामे मार्गी लावावित : शंकरानंद
By Admin | Updated: March 22, 2015 00:32 IST2015-03-22T00:32:06+5:302015-03-22T00:32:17+5:30
सिंहस्थाची सर्व कामे मार्गी लावावित : शंकरानंद

सिंहस्थाची सर्व कामे मार्गी लावावित : शंकरानंद
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पालिकेची नंतर मंजूर झालेली कामे कोणी घेण्यास तयार नाहीत; परंतु सर्व कामे मार्गी लावावित, असे आवाहन आखाडा परिषदेचे पदाधिकारी महंत शंकरानंद सरस्वती यांनी केले आहे.
सिंहस्थाच्या कामासाठी आधीच वेळ कमी त्यातच नंतर वाढीव निधी आल्यानंतर कामे कोणी घेत नाही. ठिकाणी कामे मागण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. मात्र त्र्यंबक नगरपालिकेची कामे कोणी घेत नाहीत. कामे का स्वीकारीत नाहीत, असाही सवाल महंत शंकरानंद यांनी उपस्थित केला आहे. आधीच सिंहस्थ कालावधी अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना कामाचा पत्ता नाही असे असताना कामे कशी पूर्ण होणार? असा प्रश्न पडत आहे. या कामांमध्ये आखाड्यांचे वाढीव शेड, सर्वच वाढीव रस्ते, प्रसाधनगृह, दलित वस्तीतील कामे आदि कोणी घेण्यासच तयार नाही. अधिकारी वर्गाने यात लक्ष घालून ही कामे मार्गी लावावी तरच कामे पूर्ण होतील, अशी मागणी शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे. शेड, रस्ते आदि कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ती कामे पूर्ण करून घ्यावीत, अशी मागणी शंकरानंद यांनी केली आहे.(वार्ताहर)