तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:58 IST2021-01-20T22:25:35+5:302021-01-21T00:58:22+5:30
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत ...

तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. तीन ग्रामपालिकांपैकी पेगलवाडी ही मोठी ग्रामपंचायत आहे. तिन्ही ठिकाणी सरपंचपदासाठी आता चुरस बघायला मिळणार आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आघाडीलाच कौल मिळाल्याने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा वरचष्मा आहे. फक्त विजयनगर अर्थात डहाळेवाडी येथे तीन सदस्यांचा भाजपचा एक गट निवडून आला आहे. पेगलवाडी ना. येथील नामदेव झोले हे स्वतः एका मताने पराभूत झाले. पण त्यांच्याच घरातील रवींद्र बाळु झोले, कविता (नीलम) रवींद्र झोले पदमा नामदेव झोले निवडून आले आहेत. याठिकाणी महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाल्यास पदमा नामदेव झोले किंवा कविता बाळू झोले यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पुरुषाचे आरक्षण पडल्यास रवींद्र बाळु झोले हे सरपंचपद भूषवतील. तथापि समोरच्या गटाला देखील एकच सदस्य हवा आहे. त्यामुळे गोकुळ निंबेकर, सुरेश उजे किंवा रेखा शांताराम झोले , छाया भास्कर यापैकी कुणाची लॉटरी लागते हे येणारा काळच ठरवेल.
विजयनगर तथा डहाळेवाडी या ग्रामपंचायतीत प्रकाश खाडे, उषा डहाळे व शोभा पाडेकर हे सरपंचपदाच्या शर्यतीत आहेत तर ईश्वर भांडकोळी, नीलेश जाखेरे, नंदा वाघ , शकुंतला वाघ या चार जणांचे पॅनल असले तरी वेळेवर काय राजकारण घडेल यावरच पुढचे अवलंबून असेल.
शिवाजीनगर या गावचे चित्र निकालाच्या दिवशीच स्पष्ट झाले होते. पुरुष सरपंचपदाचे आरक्षण पडले तर युवराज दत्तु बेंडकोळी हे सरपंच होतील अशी शक्यता आहे. महिला आरक्षण पडल्यास सखुबाई बेंडकोळी सखुबाई किंवा हिराबाई बेंडकुळी या दोघीपैकी कोणीतरी एकीची लॉटरी लागू शकते. शिवाजी नगरचे संघटन कौशल्य सध्या तरी आनंदराव बेंडकोळी यांच्या हातात आहे.