मालेगावी ब्रिटनमधून आलेले सातही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST2020-12-28T04:09:08+5:302020-12-28T04:09:08+5:30

मालेगावातही ब्रिटनमधून सात जण आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. तत्काळ सातही जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना ...

All seven negatives from Malegaon Britain | मालेगावी ब्रिटनमधून आलेले सातही निगेटिव्ह

मालेगावी ब्रिटनमधून आलेले सातही निगेटिव्ह

मालेगावातही ब्रिटनमधून सात जण आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले होते. तत्काळ सातही जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. मालेगावी सर्वे नं. १६ बाग - ए- महेफुस भागातील सात नागरिक ब्रिटनमधून आले होते. राज्य शासनाच्या आदेशानुसार मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ त्यांचा शोध घेऊन त्यांची ‘टेस्ट’ केली होती. त्यात सातही जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला असून आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला आहे. ब्रिटनमधून आलेले सातही नागरिक एकाच घरातील सदस्य असून त्यांना स्वतंत्र बंगल्यात ठेवण्यात आले आहे. त्यांना आणखी सात दिवस घराबाहेर पडू नका, अशा सूचना मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: All seven negatives from Malegaon Britain