शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

तेलगी घोटाळा : रेल्वे स्टॅप चोरी प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:34 IST

नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील ए क़े़ मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़ बी़ घुमरे, अ‍ॅड़ ढिकले व अ‍ॅड़ एम़ वाय क़ाळे यांनी काम पाहिले़ 

ठळक मुद्दे२००३ मधील प्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल २३ कोटी रुपयांचे स्टॅम्प चोरी प्रकरण

नाशिक : संपूर्ण देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या सातही रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचा-यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़आऱ देशमुख यांनी सोमवारी (दि़३१) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली़ दरम्यान, या खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याचे २३ आॅक्टोबर २०१७ रोजी तुरुंगात मृत्यू झालेला आहे़ सरकार पक्षाची बाजू सीबीआयचे वकील एक़े़मिश्रा यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड़ एस़बी़ घुमरे, अ‍ॅउ़ ढिकले व एम़वायक़ाळे यांनी काम पाहिले़ 

नाशिकरोडच्या भारत प्रतिभुती मुद्रणालयात छापले जात असलेले स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनद्वारे देशभरात पाठविले जातात़ मात्र, रस्त्यातच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी रेल्वे बोगीचे सील तोडून स्टॅम्पची चोरी करून ते अब्दुल करीम तेलगी यास विक्री करीत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, दिल्ली (सीबीआय) यांच्या आर्थिक गुन्हे शाखेस मिळाली होती़  त्यानुसार १६ डिसेंबर २००३ मध्ये गुन्हा दाखल करून नाशिकच्या विशेष सीबीआय न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ यामध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी रामभाऊ पवार, ब्रिजकिशोर तिवारी , विलासचंद्र जोशी, प्रमोद डहाके, मोहम्मद सरवर, विलास मोरे, ज्ञानदेव वारके यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा तसेच कट रचण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती़ 

नाशिकच्या विशेष न्यायालयात  सीबीआयने २००५ मध्ये हजारो पानी दोषारोपपत्र दाखल केले होते तर फेब्रुवारी २०१६ पासून या खटल्यात पुरावे नोंदविण्यास सुरूवात झाली होती़ यामध्ये सीबीआयचे वकील व आरोपीच्या वकीलांनी ४९ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणले या खटल्यात साक्षीदारांनी कोणाचीही नावे घेतली नाही तर काही साक्षीदारांनी सीबीआयने न सांगता जबाब घेतल्याचे सांगितले़

न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात सीबीआयने दाखल केलेले कागदपत्रे, साक्षीदारांची साक्ष हे आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ नसल्याने सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली़  तसेच स्टॅम्प चोरीबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे वा पंचनामा झाला नसल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड़ एस़बी़ घुमरे, अ‍ॅउ़ ढिकले व एम़वायक़ाळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़

 तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील महत्त्वाच्या बाबी* २००३ मधील प्रकरण : नाशिकच्या जिल्हा न्यायालयात खटल्याची  सुनावणी* आरोपींमध्ये तेलगीसह रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश* २३ कोटी रुपयांचे स्टॅम्पची चोरी झाल्याचा सीबीआयचा आरोप* सरकारी वकील व आरोपींच्या वकीलांनी ४९ साक्षीदारांची तपासणी़* खटल्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीचा २०१७ मध्ये मृत्यू

निर्दोष मुक्तता झालेले आरोपीरामभाऊ पुंजाजी पवार (रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागीय अधिकारी), ब्रिजकिशोर तिवारी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), विलासचंद्र राजाराम जोशी (निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), प्रमोद श्रीराम डहाके (उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल), मोहम्मद सरवर (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), विलास जनार्दन मोरे (शिपाई, रेल्वे सुरक्षा बल), ज्ञानदेव रामू वारके (हवालदार, रेल्वे सुरक्षा बल)

नाशिक कोर्टात हजर झाला होता तेलगीअब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षाही सुनावण्यात आल्या. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु जो पर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तो पर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला. तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैद्राबाद तर कधी बेंगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर २०१३ मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलीस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला. गेल्या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत या खटल्याचे कामकाज चालले, त्यात तो मृत्युपश्चात निर्दोष साबीत झाला.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी