शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या सर्वच शाळांना ‘अ’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:31 IST

शासनाच्या निकषानुसार मागे पडलेल्या सर्व शाळांमध्ये प्रगत अध्ययन उपक्रम आणि अचूक प्रतिसाद मिळवत नाशिक महापालिकेच्या सर्व म्हणजे ९० शाळा प्रगत किंवा अर्ज दर्जाच्या झाल्या असून, तसे शिक्षण खात्याने प्रमाणित केले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी त्याची घोषणा केली जाणार आहे.

नाशिक : शासनाच्या निकषानुसार मागे पडलेल्या सर्व शाळांमध्ये प्रगत अध्ययन उपक्रम आणि अचूक प्रतिसाद मिळवत नाशिक महापालिकेच्या सर्व म्हणजे ९० शाळा प्रगत किंवा अर्ज दर्जाच्या झाल्या असून, तसे शिक्षण खात्याने प्रमाणित केले आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी त्याची घोषणा केली जाणार आहे.महापालिकेच्या निमशासकीय शाळांमध्ये येणारा वर्ग हा समाजातील मध्यम आणि निम्नस्तरावरील असतो. साहजिक येथे येणाऱ्या मुलांना अध्यापन करताना शिक्षकांची प्रतिष्ठा पणाला लागत असते. शासनाने अशाप्रकारच्या शाळांचा दर्जा उन्नत करण्यासाठी प्रगत शाळा अभियान २०१५ मध्ये सुरू केले. त्या अंतर्गत २५ निकष ठरविण्यात आले. प्रत्येक निकषाला पाच गुण याप्रमाणे सध्या १२५ गुण दिले जातात. यातशाळा परिसर स्वच्छता, ज्ञान रचनावादी सिद्धांतानुरूप साहित्यपासून विद्यार्थ्याला किमान एक अचूक बेरीज करता आली पाहिजे तसेच गुणकार भागाकार करता आले पाहिजेत, तसेच वजन मापे, आकारमान, लांबी-रुंदी, वेळ सांगता आली पाहिजे आणि पाच वाक्ये वाचता आली पाहिजे अशाप्रकारच्या अटी आहेत.राज्य शासनाने त्यासाठी पोर्टलवर माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे. राज्य शासनाच्या यामोहिमेत नाशिक महापालिकेच्या पूर्वीच्या १२८ शाळांपैकी १३ शाळांना अपेक्षित गुण प्राप्त होत नसल्याने त्या मागे पडल्या होत्या.शासनाने ० ते ४०, चाळीस ते साठ, साठ ते ऐंशी आणि पुढेशंभर अशाप्रकारच्या गुणदानाचे निकष ठरवले आहेत.त्यानुसार महापालिकेच्या यात १३ शाळांसाठी गेल्या वर्षीपासून कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी शाळा एकत्रीकरण करून १२८ शाळांपैकी अनेक शाळाएकत्र करून ९० शाळातयार करण्यात आल्या आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने प्रयत्नपूर्वक कृती योजना राबविली आणि आता सर्व शाळा ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून ‘अ’दर्जापर्यंत पोहोचल्या आहेत.उर्दू शाळा अधिक सरसशासनाच्या प्रगत शाळा योजनेंतर्गत नाशिक महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक प्रगत ठरल्या असून, त्यांचे उर्दू शैक्षणिक साहित्य राज्यस्तरावर आदर्श मानले गेले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा