सातपूरला सर्वपक्षीय फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:12 IST2020-12-08T04:12:38+5:302020-12-08T04:12:38+5:30

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे ...

All round tour to Satpur | सातपूरला सर्वपक्षीय फेरी

सातपूरला सर्वपक्षीय फेरी

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सातपूर गावातील ग्रामस्थ, व्यापारी, विक्रते, यांना ‘भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी . एल. कराड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, बहुजन समाज पार्टीचे रवी काळे, सीताराम ठोंबरे, संजय पवार, मोहन जाधव, नाना भंदुरे, गोरक्ष सोनवणे, राजाराम पाटील निगळ, छगन भंदुरे, संजय भंदुरे, धनंजय भंदुरे, आदेश भंदुरे, शिवाजी भंदुरे, संदेश भंदुरे आदींसह ग्रामस्थ व व्यापारी सहभागी झाले होते.

(फोटो ०७ फेरी) बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना सर्वपक्षीय पदाधिकारी.

Web Title: All round tour to Satpur