शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

शहरातील सर्व नद्या शुद्ध, केवळ अकरा नाले प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:27 IST

उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण झाल्या आहेत. शहरातील हवाही उत्तम आहे, मात्र केवळ काही व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट असल्याचा दावा महापालिकेने या अहवालात केला आहे.

ठळक मुद्देमनपाचा अजब निष्कर्ष : विविध भागात आवाजाचा दणदणाट

नाशिक : उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण झाल्या आहेत. शहरातील हवाही उत्तम आहे, मात्र केवळ काही व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट असल्याचा दावा महापालिकेने या अहवालात केला आहे.महापालिकेच्या मंगळवारी(दि. २०) झालेल्या महासभेत पर्यावरण विभागाच्या वतीने पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी यांनी अहवाल सादर केला. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान शहराच्या विविध भागांत ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणाची तपासणी केली जाते. त्यानंतर यासंदर्भातील अहवाल त्यापुढील वर्षात जुलै महिन्याच्या आत महासभेवर ठेवून तो मंजूर करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार हा अहवाल मांडण्यात आला होता. नदी प्रदूषण हा सर्वाधिक चर्चेचा विषय असून, अनेक आंदोलने झाल्यानंतरदेखील नदी शुद्ध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहेत. महापालिकेच्या वतीने गोदावरी, दारणा, नासर्डी व कपिला या चार नद्यांचे नमुने तपासण्यात आला. मनपाने पाण्याचे प्रवाहाच्यावर, मध्य प्रवाह आणि निम्न स्थानी नमुने तपासल्यानंतर त्यात प्रदूषणकारी घटक नसल्याचा पर्यावरण विभागाचा दावा आहे. याशिवाय महापालिका क्षेत्रात २५ नाले असून, त्यातील ११ नाले प्रदूषित आहेत. या नाल्यांमधील बीओडी (बायोकेमिकल आॅक्सिजन डिमांड) वाढली असून, पाण्यातील आॅक्सिजन कमी झाल्यामुळे प्रदूषण वाढल्याचा पर्यावरण विभागाचा दावा आहे. बारदान फाटा नाला, लेंडीनाला, सोमेश्वर नाला, कन्नमवार पूल नाला, जाधव बंगला नाला, पिंपळपट्टी नाला, चिखली नाला, जोशीवाडा नाला, मानूर नाला, चव्हाण कॉलनी नाला, प्रदूषित असल्याचे आढळले आहे. ध्वनी प्रदूषणाच्या मापनात अनेक ठिकाणी आवाजाचा दणदणाट आढळला आहे. ध्वनी प्रदूषणासाठी दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसीबलपर्यंत ध्वनी मर्यादेचा निकष आहे. मात्र ही मर्यादा ओलांडून या भागात दिवसा सरासरी ७० डेसीबल, तर रात्री ६५ डेसीबलपर्यंत आवाज आहे.हवा चांगलीमहापालिकेने हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयटीआय सिग्नल तसेच सातपूर, अंबड एमआयडीसी, मेनरोड, मुंबई नाका, जुने सी.बी.एस, पंचवटी कारंजा व द्वारका येथील हवेचे नमुने तपासले त्यातील धुलीकण, अतिसूक्ष्म धुलीकण, सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजनडाय आॅक्साइड आणि कार्बन मोनाक्साइड यांची तपासणी करण्यात आली मात्र हे सर्वच निकषानुसार असल्याचे आढळले असा दावा अहवालात करण्यात आला आहे.औद्योगिक क्षेत्र हे सर्वात प्रदूषणकारी घटक असल्याचे मानले जात असताना प्रत्यक्षात मात्र नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड येथे ध्वनी प्रदूषण होत नाही, असा अजब दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण