शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कळवणला सर्वपक्षीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा,

कळवण : सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा, नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार, दि. १ जून पुनंद धरण कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पुनंद जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकºयांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार जे.पी.गावित,जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केले जात असून एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे मत आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केले. पुनंद खोºयातीलच नव्हे तर परीसरातल्या सर्वच शेतकºयांनी आणि आदिवासी बांधवांनी हक्काचे पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केले. यापूर्वी आंदोलने करूनही पाणीयोजनेचा घाट घातला जात असून, कळवणकरांची पाणी देण्याला नव्हे तर पाइपलाइनला असलेल्या विरोधाची भूमिका शासन व प्रशासनाने समजून घ्यावी असे मत जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.बाजार समिती सभापती धनंजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कारभारी आहेर, हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.कालव्याद्वारे पाणी न्यावेसटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने५५ कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवणकरांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत या योजनेचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना दिल्याने काम सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र कळवण तालुक्यातील शेतकºयांचा विरोध कायम असून, पाइपलाइनद्वारे नव्हे तर कालव्याद्वारे पाणी न्यावे यावर कळवणकर ठाम आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणीGovernmentसरकार