भाजपासह सर्वच पक्षांच्या याद्या रखडल्या

By Admin | Updated: February 2, 2017 01:47 IST2017-02-02T01:46:42+5:302017-02-02T01:47:50+5:30

इच्छुक प्रतीक्षेत : कॉँग्रेसची रात्री उशिरापर्यंत बैठक

All parties list including BJP | भाजपासह सर्वच पक्षांच्या याद्या रखडल्या

भाजपासह सर्वच पक्षांच्या याद्या रखडल्या

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने बुधवारी यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात भाजपासह कोणत्याही पक्षाने उमेदवारांची नावे घोषित न केल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना किमान आता तरी उमेदवारी यादी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु पालकमंत्री नाशिकमध्ये आले नसल्याचे सांगून यादी जाहीर करणे टाळण्यात आले. पक्षातील नेत्यांंमध्येच इच्छुकांसाठी सुरू असलेली रस्सीखेच आणि त्यातून उद्भवणारे वाद तसेच बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन भाजपा जपून पावले उचलीत आहे. रात्री उशिरा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आगमन होणार होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी उमेदवारी यादी घोषित होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: All parties list including BJP