सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण

By Admin | Updated: November 12, 2016 22:20 IST2016-11-12T22:19:52+5:302016-11-12T22:20:48+5:30

येवल्यात रणसंग्राम सुरू : घरोघरी मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात

All parties are involved in rebellion | सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण

सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण

 दत्ता महाले ल्ल येवला
पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्यक्ष रणांगणावरचा संग्राम सुरू झाला आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे स्वबळ आणि भाजपा - सेनेत प्रत्यक्ष युतीच्या शब्दाचा वापर असला तरी चार जागांवर भाजपा व शिवसेना आमनेसामने लढत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी विविध प्रभागांतून राष्ट्रवादी २३, कॉँग्रेस १५, शिवसेना १४, भाजपा ९, भारिप बहुजन महासंघ १ आणि अखिल भारतीय सेना १ जागेवर निवडणूक लढवीत आहे. याशिवाय चोवीसपैकी आठ प्रभागात ४६ अपक्ष रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. पालिकेत १२ विद्यमान नगरसेवक पुन्हा रिंगणात आहेत. भाजपात तिघांनी, शिवसेनेत एकाने तर राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी स्वपक्षाच्या उमेदवारांविरोधात अथवा उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी करीत स्वत:चा झेंडा घेऊन रिंगणात उडी घेतली आहे. या तिन्ही प्रमुख पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी एकच अथवा परस्पर विरोधी पक्षातून परदेशी, शिंदे, लोणारी, जावळे, क्षीरसागर यांच्या घरातील २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Web Title: All parties are involved in rebellion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.