इगतपुरीत सुफी संतांचे अखिल भारतीय चर्चासत्र
By Admin | Updated: October 27, 2015 23:11 IST2015-10-27T23:10:33+5:302015-10-27T23:11:04+5:30
राष्ट्रीय एकात्मता : दुबळेपण नाहीसे करण्यासाठी युवा वर्गाने पुढे यावे

इगतपुरीत सुफी संतांचे अखिल भारतीय चर्चासत्र
इगतपुरी : येथील मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात राष्ट्रीय एकात्मता या विषयावर उस्मानाबादचे आस्ताने आलिया हामिदिया इस्तेखारिया यांचे सुफी प्रवचन झाले.
अन्याय अत्याचाराविरुध्द लढा देऊन समाजातील दुबळेपण नाहीसे करण्यासाठी युवा वर्गाने पुढे यावे, असे आवाहन इस्तेखारिया यांनी यावेळी केले. मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रीय सलोख्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. चर्चासत्रात महाराष्ट्राच्या विविध विभागातून सुफी संत सहभागी झाले होते.
मनुष्य हितकारी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. मोहम्मद आरीफ खान, इगतपुरी विभाग अध्यक्ष डॉ. इकबाल नगावकर, शेख शफीक जमाल, खान उस्मान, तस्लीम आरीफ पटेल, हाजी अब्दुल रहिम शेख, मुर्तुजा मोमीन उमेश कस्तुरे, विजय गोडे, वसीम खान यांनी स्वागत केले. हैद्राबाद येथील सुफी संत हजरत अन्वर उल्ला हुसैनी, औरंगाबादचे डॉ. शाह जाकीर हमिद, जुनेद अली शाह, हजरत सैयद इसुफ अली शाह, हफिज अरीफ शाह, शाहा सनीम चिस्ती, सादिक अली शहा यांची प्रवचने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हजरत शाह जाकीर हमीद, शेख शफिक जमाल, खान उस्मान मुसा, रशिद अब्दुल शेख, नेहरू युवाचे समन्वयक भगवान गवई, मोहम्मद आरीफ खान, तस्लीम आरीफ पटेल, डॉ. इकबाल नगावकर, सादिक शेख, आदिनीं परिश्रम घेतले. (वार्ताहर)