शहरातील सर्वच हनुमान मंदिरे सजविली

By Admin | Updated: April 4, 2015 01:59 IST2015-04-04T01:59:01+5:302015-04-04T01:59:29+5:30

शहरातील सर्वच हनुमान मंदिरे सजविली

All the Hanuman temples in the city have been decorated | शहरातील सर्वच हनुमान मंदिरे सजविली

शहरातील सर्वच हनुमान मंदिरे सजविली

नाशिक : चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीनिमित्त शक्ती आणि बुद्धीची देवता समजल्या जाणाऱ्या हनुमानाला अभिवादन करण्यासाठी भाविकांनी शहरातील सर्वच हनुमान मंदिरे सजविली असून, त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय बलाची उपासना करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तालमींमध्येही जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सराफ बाजार येथील सोन्या मारुती मंदिरात सकाळी जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी पंचखाद्य आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे. यंदा मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट केली जाणार आहे.
पंचवटी येथील पंचमुखी हनुमान या मंदिरात सकाळी ५ वाजता अभिषेक, सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्म, आरती, हनुमान चालिसा सामूहिक पठण, सायंकाळी पुष्पांजली महिला मंडळाचे संगीतमय सुंदरकाण्ड आदि कार्यक्रम होतील. दिवसभर प्रसादाचे वाटप केले जाईल.

Web Title: All the Hanuman temples in the city have been decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.