शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:47 IST

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे.

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.गोदावरी नदीवर असलेल्या गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी या तीनही धरणांचा साठा १०० टक्केअसून, आळंदीदेखील १०० टक्के भरले आहे. समूहातील या चारही धरणांमध्ये सध्या १०,३२० दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागीलवर्षी हा साठा १०,१४२ इतकाच दलघफू होता. दरम्यान, जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा साठा ८० टक्के इतकाच होता.दरम्यान, हवामान खात्याने आगामी ४८ तासात उत्तरमध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.नांदूरमधमेश्वरमधून विसर्गआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदूरमधमेश्वर धरण जिल्ह्यात सर्वांत प्रथम १०० टक्के भरल्याने त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. या हंगामात नांदूरमधमेश्वरमधील हे विक्रमी विसर्ग ठरला. आता पावसाला पुन्हा सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाल्यामुळे विसर्ग सुरू झाला आहे. त्यातही नांदूरमधमेश्वरमधून सर्वाधिक ७,६२४ क्यूसेक इतका विसर्ग केला जाता आहे.१४ धरणांचा साठा १०० टक्केवरुणराजाची भरभरून कृपादृष्टी झाल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली आहेत. जवळपास सर्वच धरणांचा साठा हा ९० टक्केच्या पुढे असून, २४ पैकी १४ धरणांमधील पाणीसाठा, तर १०० टक्के इतका आहे. गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, तीसगाव, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, हरणबारी, केळझर या धरणांचा पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सद्यस्थितीत १५ प्रकल्पांमधून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.जिल्ह्यात मोठे मध्यम असे एकूण २४ प्रकल्प आहेत. त्यामध्ये सात मोठे प्रकल्प असून, १७ मध्यंम प्रकल्पाची संख्या आहे. यासर्व प्रकल्पांची क्षमता ६५८१४ संकल्पित पाणीसाठा असून, मोठ्या प्रकल्पांमध्ये ४८००४ इतकी साठवण क्षमता आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण