शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात हलगर्जी ; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:49 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करीत नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महासभेत आरोग्याधिकारी डॉ. कोठारी व डॉ. इंदोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी सभागृहात दिले.

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करीत नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महासभेत आरोग्याधिकारी डॉ. कोठारी व डॉ. इंदोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी सभागृहात दिले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांनाही निलंबित ठेवावे, असे भानसी यांनी यावेळी सांगितले.  कोठारी यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर ठेवल्याचा आरोप नगरसेवक माने यांनी केला. गंगापूर गावातील प्रसूतिगृह असून नसल्यासारखे झाले आहे. मागील काही महिन्यांपासून येथील मनपाचा दवाखाना बंद पडलेला असल्याचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले. डॉ. कोठारी, डॉ. सचिन हिरे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याचे ते म्हणाले. तसेच गंगापूर गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मोफत साहित्यदेखील उपलब्ध केले जात नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगरसेवक समीना मेमन यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय परिसरातील अतिक्रमण निर्मूलनाचा प्रश्न उपस्थित करीत हे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. मुंढे यांनी याबाबत तत्काळ संबंधित विभागाला सूचना करीत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. तसेच प्रसूतिगृह व स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.शहाणे यांची ‘गांधीगिरी’; पेलिकन पार्कला दोन कोटीसिडकोमधील पेलिकन पार्कच्या विकासाचा रेंगाळलेला प्रश्न प्रशासनाकडून मार्गी लावला जात नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत महापौरांच्या समोर ठिय्या दिला. त्यावेळी त्यांना उपस्थित विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दर्शविला. मुंढे यांनी पेलिकन पार्कच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींच्या निधीला मान्यता दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य