महाविद्यालयात ‘सारी डे’
By Admin | Updated: February 4, 2016 22:47 IST2016-02-04T22:46:48+5:302016-02-04T22:47:26+5:30
महाविद्यालयात ‘सारी डे’

महाविद्यालयात ‘सारी डे’
मनमाड : युवा महोत्सवात पारंपरिक वेशभूषेला उजाळामनमाड : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात युवा महोत्सवाअंतर्गत ‘सारी व शेरवानी डे’चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शेरवानी तर विद्यार्थिनींनी साडी परिधान करून आपल्या पारंपरिक वेशभूषेला उजाळा दिला. साडी हे महाराष्ट्रीयन नारीच्या संस्कृतीचे प्रतीक असल्याचा संदेश या वेळी देण्यात आला. यावेळी आयोजित संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या दिनामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेचे महत्त्व लक्षात आले. या वेळी प्राचार्य एस.एस. तावडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.एन. राठोड, प्रा. वैशाली दामले, प्रा. डी.डी. गव्हाने, प्रा.ए.पी. नवले, प्रा. आर.बी. उगले, विद्यापीठ प्रतिनिधी इम्रान शेख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)