नाशिकमधील सर्व बांधकामे राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST2021-04-21T04:15:21+5:302021-04-21T04:15:21+5:30

नाशिक : जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांनी आपली चालणारी ...

All constructions in Nashik will remain closed | नाशिकमधील सर्व बांधकामे राहणार बंद

नाशिकमधील सर्व बांधकामे राहणार बंद

नाशिक : जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांनी आपली चालणारी कामे, साईट तसेच इतर कामे दि. २१ ते १ मे या कालावधीत बंद ठेवावीत, असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय)च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय चोकसी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती, वाढणारी संख्या ही भीतीदायक झाली आहे. शासन, प्रशासन, पोलीस व आरोग्य सेवा देणारे सर्वांवर ताण निर्माण झाला असून रुग्णांना सेवा देणारी यंत्रणा कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूची साखळी तोडून हा ताण कमी करण्यासाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेशी सर्व संबंधितांना त्यांचे काम बंद ठेवण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अभय चोकसी, सचिव विजय बाविस्कर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील व अन्य सभासद यांनी केले आहे.

Web Title: All constructions in Nashik will remain closed