त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्व उमेदवारी अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:11 IST2020-12-31T21:57:08+5:302021-01-01T00:11:56+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फक्त तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डहाळेवाडी १७, पेगलवाडी ना. २४ तर शिवाजीनगर ९ असे अर्ज आले

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्व उमेदवारी अर्ज वैध
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फक्त तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डहाळेवाडी १७, पेगलवाडी ना. २४ तर शिवाजीनगर ९ असे अर्ज आले असुन तिन्ही ग्रामपंचायती मिळुन एकुण ५० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी अर्ज छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. दरम्यान सोमवारी (दि.४) अर्ज माघार घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
तीनच ग्रामपंचायती असल्या तरी शिवाजीनगर या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये पाच वॉर्डमध्ये बिनविरोध निवड होणार असल्याने व दोन ग्रामपंचायतीमध्ये एका एका जागेसाठी दोन दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकींमध्ये तरुणांचा भरणाअधिक असल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान उमेदवारी अर्जावरुन शिवाजीनगर ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.