मद्यपी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:17 IST2021-01-19T04:17:45+5:302021-01-19T04:17:45+5:30

सिडकोतील उत्तमनगर भागात असलेल्या शिवपुरी चौक, नंदवन चौक तसेच शनी मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक ‘भाई’ कार्यरत झाले ...

Alcoholics should be dealt with | मद्यपी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा

मद्यपी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा

सिडकोतील उत्तमनगर भागात असलेल्या शिवपुरी चौक, नंदवन चौक तसेच शनी मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक ‘भाई’ कार्यरत झाले आहेत. अंधाराचा फायदा घेत हे टोळके बिनधास्तपणे मद्यपान करून धमाकूळ घालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या टवाळखोरांना हटकले तर शिवीगाळ करीत नागरिकांच्या घरांवर दगडफेक करतात, तसेच घरातील साहित्य फेकत ज्येष्ठांना मारहाण करण्यापर्यंतही त्यांचे धाडस होऊ लागल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष न घातल्यास कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात जुगाराचा अड्डा असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके येथे जमा होतात, तसेच मद्यपान करून रात्री उशिरापर्यंत टोळक्याकडून गोंधळ घातला जातो. या गोंधळाला रहिवासी चांगलेच वैतागले आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी एका टोळक्याने वासुदेव पार्क येथील रहिवाशांच्या घरात घुसून दगडफेक करत सायकलही फेकली. तसेच ज्येष्ठ नागरिकास मारहाणही केली. त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत चालली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Alcoholics should be dealt with