अलाई यांचे समको बँक संचालक पद रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:19 IST2021-03-23T19:18:41+5:302021-03-23T19:19:10+5:30
सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अलाई यांचे समको बँक संचालक पद रद्द
सटाणा : येथील मर्चंट बँकचे संचालक राजेंद्र अलई यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिल्याने सहकार वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सटाणा मर्चंट को. आँप. बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक राजेंद्र बाळकृष्ण अलई यांनी गेल्या वर्षभरात दि.९ जुन २०२० पासुन आज पावेतो बँकेच्या कुठल्याही कामकाजात किंवा सभासदांच्या अडीअडचणीकडे लक्ष न देता अध्यक्षपद सोडल्यानंतर बँकेकडे पुर्णपणे पाठ फिरवली असुन बँकेच्या आदर्श मंजूर पोटनियम क्र ४५ (१२) चा देखील भंग केल्याची तक्रार बँकेचे सभासद विजय भांगडिया यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दि. १२जानेवारी २०२१ रोजी केली होती.
या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुनावणीचे कामकाज वेळोवेळी झालेले असुन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ (अ१) (१) (चार) व अधिनियम १९६१ चे नियम ५८ मधील तरतुदीनुसार संचालकपदावर राहण्यास अपात्रता येत असल्याने राजेंद्र बाळकृष्ण अलई यांना संचालक पदावरून कमी करण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांनी घेतला आहे
या तक्रारीच्या सुनावणी कामी बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे तक्रारदार यांच्यातर्फे विजय भांगडिया व राजेंद्र अलई यांचे तर्फे ॲड. शिरिष बागडे यांनी कामकाज पाहिले. मात्र सुनावणी दरम्यान ऐनवेळी ॲड. बागडे यांनी अलई यांचे कामकाज करणे शक्य नसल्याचे म्हटले असुन त्यांचे सदर तक्रारीबाबत काहीही एक म्हणणे नसल्याचे सांगितल्याने जिल्हा उपनिबंधक यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश निर्गमित केला.
या आदेशामुळे बँकेचे संचालक मंडळ १७ पैकी ६ ने कमी होवून ११ वर आलेले असुन अजून काही संचालकांवर वेगवेगळ्या आरोपातून लवकर अपात्रता येण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा बँक वर्तुळात चर्चा आहे. (२३ सटाणा बँक)