शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरांना अक्षय कुमार देणार गुड न्यूज ; मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी, निसरर्गोपचार केद्राचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:40 IST

बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमार नाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणीही केल्याचे कळते.

ठळक मुद्देसुपर स्टार अक्षय कुमारचा नाशकात गोपनीय दौरानाशकात मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी सुरु करण्याचा विचारनिसर्गोपचार केंद्राचाही विचार असल्याची सुत्रांची माहिती

नाशिक : बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमारनाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी तीन दिवसांपूर्वी गोपनीय दौऱ्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणीही केल्याचे कळते.अक्षय कुमार खासगी हॅलिकॉप्टरने नाशिकला आले होत.  येथील सपकाळ नॉलेज हबच्या हेलीपॅडवर त्यांचे आगमन झाल्यानंतर सपकाळ नॉलेज हबचे  अध्यक्ष रविंद्र सपकाळ व कल्याणी सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अक्षय कुमार त्र्यंबकेश्वर परसिरातील ग्रेप काऊंटी येथे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांची  काही व्यक्तींशी व्यावसायिक चर्चा होणार होती. त्यासाठी अक्षय कुमार यांनी ग्रेप काउंटी येथे मुक्कामही केला. या मुक्कामात त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांविषयी महत्वाच्या बाबींवर विचार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून त्यांच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आल्या तर नाशिककरांना लवकरच गुड न्यूज  मिळण्याची शक्यता आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकमध्ये निसर्गोपचार केंद्र  अथवा मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी सुरु झाल्यास नाशिकध्ये आरोग्याची  व  स्वत:ची काळजी घेणाऱ्या पर्यटकांची संख्या  मोठ्या प्रमाणात वाढून त्यातून नाशिकच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच सरकारने नाशिकमध्ये चित्रीकरणालाही परवानगी आहे. त्यामुळे अक्षय कुमार त्यांच्या एखाद्या आगामी चित्रपटाच्या तयारी साठी तर नाशिकमध्ये आला नव्हते ना, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र कोणत्याही कामानिमित्त का होईना अक्षय कुमार नाशिकमध्ये येऊन राहणे ही  नाशिककरांसाठी आनंदाचीच बाब आहे. त्याहूनही आनंदाची बाब म्हणजे अक्षय कुमार लवकरच पुन्हा नाशिकला  येणार असून त्यावेळी ते नाशिककरांना त्याच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याविषयी गूड न्यूज देऊ शकतात,  अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडNashikनाशिकAkshay Kumarअक्षय कुमारMarshal Artsमार्शल आर्ट