जोरणच्या सरपंच पदी आक्काबाई माळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:49 IST2019-12-16T16:49:00+5:302019-12-16T16:49:29+5:30
जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथिल ग्रामपंचायतीची थेट सरपंच व सदस्य पदाची निवड संपन्न होऊन यात सरपंच पदी अक्काबाई माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नऊ सदस्यासाठी निवडणू लागली होती त्यात तीन जागा रिक्त राहील्यात तर दोन सदस्य यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली होती.

सरपंच आक्काबाई माळी,उपसरपंच सुभाष सावकार,सदस्य वसंत सोनवणे,बापु पवार,काकाजी देवरे,सुरेश बेडीस,मुरलीधर सावकार,रमेश सावकार,संजय सावकार,नवल सावकार,आदि.
चार सदस्यासाठी निवडणूक लागली. वार्ड क्र मांक एक मध्ये आरक्षण जनरल पुरु ष राखीव असल्यामुळे तिरंगी लढत झाली होती.यात सुभाष बाबुराव सावकार हे विजयी झाले. उपसरपंच पदासाठी सोमवारी सकाळी दहा वाजता सुभाष सावकार यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच शासकिय नियमानुसार दोन वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतिक्षा केली मात्र
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक डी.के.कापडणीस यांनी काम पाहीले व यावेळी उपस्थित महादु सावकार,पोपट सावकार,धर्मा सावकार,लक्ष्मण सावकार,दिपक सावकार,शिवाजी सावकार,अभिमन सावकार,केशव सावकार,बाबुराव देवरे,विश्वास देवरे,यशवंत कोर,परशराम सावकार,महादु देवरे,कारभारी बेडीस,वसंत सावकार,आदीउपस्थित होते.