पेठे विद्यालयात साकारले आकाशकंदील
By Admin | Updated: November 11, 2015 21:46 IST2015-11-11T21:45:40+5:302015-11-11T21:46:33+5:30
पेठे विद्यालयात साकारले आकाशकंदील

पेठे विद्यालयात साकारले आकाशकंदील
नाशिक : रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयात दिवाळीच्या औचित्यावर विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासूनपासून टिकाऊ आकाशकंदील साकारले. यावेळी मुख्याध्यापक गीता कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, प्रियंका निकम उपस्थित होते.
अभिनव बालमंदिरात दिवाळी
मविप्र संचलित गंगापूररोडवरील अभिनव बालविकास मंदिरात चिमुकल्यांनी दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला. वसूबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या सणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी लक्ष्मीपूजन व वसूबारसनिमित्त गाय-वासराची पूजा करण्यात आली. दरम्यान, कागदी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.