दीपावलीनिमित्त अजित कडकडे यांची भावगीत मैफल रंगली

By Admin | Updated: October 30, 2016 00:48 IST2016-10-30T00:48:04+5:302016-10-30T00:48:25+5:30

दीपावलीनिमित्त अजित कडकडे यांची भावगीत मैफल रंगली

Ajit Kadak plays a bhoghme miffed for Deepavali | दीपावलीनिमित्त अजित कडकडे यांची भावगीत मैफल रंगली

दीपावलीनिमित्त अजित कडकडे यांची भावगीत मैफल रंगली

नाशिकरोड : दीपावली, धन्वंतरी जयंती तथा राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त उत्सव मंगल कार्यालयात श्री गजानन महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित गायक अजित कडकडे यांची भावगीत, अभंग, भक्तीगीत, नाट्यसंगीत यांची मैफल उत्साहात पार पडली.  उत्सव मंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी आयोजित गीतगायन कार्यक्रमाचे उद्घाटन गायक अजित कडकडे, सुरेश बाबा पाटील, बाजीराव भागवत, संगीता गायकवाड, डॉ. सीमा ताजणे, शरद मोरे, कन्हैया साळवे आदिंच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.  धन्वंतरी दिनानिमित्त डॉ. अशोक निरगुडे, डॉ. समीर लासुरे, डॉ. तुषार देवरे, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. महेश भालेराव, डॉ. अमित विसपुते, डॉ. सीमा ताजणे, डॉ. अंबादास कुलकर्णी आदि डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी केले. यावेळी दीपक चंदे, सुजॉय गुप्ता, प्रकाश घुगे, भजुशेठ परदेशी, पुष्पा गवांदे, मुरलीधर मोरे, मीरा तुंगार, संजय खालकर, सागर गायकवाड, हेमंत गायकवाड, राजेंद्र ताजणे, दत्ता कुलकर्णी, सुहास अडसूळ, विवेक दंडवते, हेमंत नाईक, कांता वराडे, प्रभा पारगावकर, विजया कंकरेज, रमेश राव, आसावरी मोरूस्कर, अ‍ॅड. नंदकुमार सूर्यवंशी आदिंसह श्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)






 

Web Title: Ajit Kadak plays a bhoghme miffed for Deepavali