अजंगला मेंढ्या चारण्यावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST2021-07-31T04:15:45+5:302021-07-31T04:15:45+5:30

---- मालेगाव मार्केट यार्डातून दुचाकी चोरी मालेगाव : येथील भाजीपाला मार्केट यार्डातून १५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी ...

Ajangala fights over sheep grazing | अजंगला मेंढ्या चारण्यावरून हाणामारी

अजंगला मेंढ्या चारण्यावरून हाणामारी

----

मालेगाव मार्केट यार्डातून दुचाकी चोरी

मालेगाव : येथील भाजीपाला मार्केट यार्डातून १५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (एमएच ४१ एएन ७८१८) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. कल्पेश गजानन जगताप (वय ३३, रा. हिंमतनगर) या भाजीपाला विक्रेत्याने कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

----

चिंचावडला वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यावर हल्ला

मालेगाव : तालुक्यातील चिंचावड येथे घराचा वीज पुरवठा खंडित का केला या कारणावरून कुरापत काढून वीज वितरणाची वायर टाकण्याचे सरकारी काम करीत असताना वीज वितरण कर्मचारी राहुल खरे यांना शिवीगाळ, दमदाटी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तालुका पोलिसांत आकाश बापू भदाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वीज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ राहुल अभिमान खरे यांनी फिर्याद दिली. आराेपींने विष पिऊन मरून जाईल व तुमचे नाव घेईन असा दम देऊन शर्टाची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Ajangala fights over sheep grazing