अजंगला प्रबोधनात्मक कार्यक्रम
By Admin | Updated: October 16, 2015 21:56 IST2015-10-16T21:54:07+5:302015-10-16T21:56:48+5:30
अजंगला प्रबोधनात्मक कार्यक्रम

अजंगला प्रबोधनात्मक कार्यक्रम
मालेगाव : तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यातर्फे अजंग येथे समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन डिजिटल फलकांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, हवालदार मानकर, पोलीस नाईक मनोज पानपाटील, सरपंच नर्मदाबाई पवार, उपसरपंच बेबीबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर देवरे, मुरलीधर शेलार, एस. के. पगार, एस. यू. देवरे, एस. बी. शुक्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते म्हणाले, ग्रामस्थांनी जातीय सलोखा टिकवून ठेवावा. वडनेर खाकुर्डी पोलिसांतर्फे पोलीस मित्र संकल्पना राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त
ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन बेकायदा व अवैध कारभारांना
आळा घालावा. त्यांनी जातीय सलोखा अबाधित ठेवून घातपातविरोधी कारवाईविषयी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांना शाळेत जाताना- येताना संशयास्पद वस्तु किंवा वाहने आढळल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी असे सांगून ग्रामस्थांना पोलीस ठाण्याचे नंबर देण्यात आले. भ्रमणध्वनीवरील व्हॉटस्अॅपवरील जाती-धर्माचे चित्रिकरण, महापुरुषांची विटंबना, चुकीचे संदेश प्रसारीत करणे अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करुन दहशतवाद व फेसबुक वरील आक्षेपार्ह चित्रिकरणाबाबत मुला-मुलींना माहिती देत शंकांचे निरसन करण्यात आले.अजंग येथे वडनेर खाकुर्डी पोलिसांतर्फे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते. समवेत सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, मनोज पानपाटील, सरपंच नर्मदाबाई पवार, उपसरपंच बेबीबाई पवार व ग्रामस्थ.