बांधकामासाठी हवा लष्कराचा दाखला

By Admin | Updated: July 28, 2016 01:10 IST2016-07-28T01:03:29+5:302016-07-28T01:10:48+5:30

नागरिकांची धावपळ : नगररचना विभागाची अडवणूक

Air Force certificate for construction | बांधकामासाठी हवा लष्कराचा दाखला

बांधकामासाठी हवा लष्कराचा दाखला

इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील लष्कर हद्दीच्या सुमारे पाचशे मीटर अंतराच्या आतील मिळकतधारकांना बांधकाम करताना लष्कराची हरकत नसल्याचा दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने बांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांना सदरचा दाखला घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी विमानतळ बनविण्यासाठी लष्कराच्या हद्दीलगत असलेल्या विविध सोसायटी, अपार्टमेंट व कॉलनीधारकांना नोटीस बजविण्यात आली होती. त्यामुळे आयुष्याची जमा पुंजी लावून तयार घरे सोडण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली होती. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. सर्व राजकीय पक्षाने निवेदन, आंदोलन व मोर्चा काढूून विरोध दर्शविला होता. सर्वांचा विरोध लक्षात घेता विमानतळाचे काम सोडून देण्यात आले होते.
प्रभाग ५४ मध्ये लष्कर हद्दी संरक्षण कुंपणाच्या हाकेच्या अंतरावर श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, शिवकॉलनीसह विविध अपार्टमेंट्स, सोसायटी व कॉलनी आहेत. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने लोकवस्ती आहे.
गेल्या पाच वर्षांत परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट्स, सोसायटी व कॉलनी वाढल्या आहेत. त्यापैकी कोणालाही महापालिकेच्या नगररचना विभागाने लष्कराचा ना हरकत दाखला आणण्याचे सांगितले नाही. आता श्रद्धा विहार कॉलनीत तीन बंगल्यांच्या बांधकामास सुरुवात झाली. त्या मिळकतधारकांनी नगररचना विभागाकडे बांधकामाची परवानगी मागितली असता त्यांच्याकडून लष्करानी ना हरकत दाखला आणण्यास सांगितला. त्यानुसार लष्कराचा ना हरकत दाखला घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका भेटीत संबंधित अधिकारी काही भेटत नाही किंवा असल्यास ते लगेच भेटतही नाहीत.
लष्कराचा कायदा वेगळा आहे. तसेच लष्कराचे अधिकारी भेटल्यावर बांधकामाची जागेची पाहणी केल्यावरच ना हरकत दाखला देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार काही बांधकामाची लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. जेव्हा लष्कराचा दाखला मिळेल तेव्हाच नगररचना विभागाकडून परवानगी मिळणार आहे. त्यामुळे मिळकतधारक अडचणीत सापडले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Air Force certificate for construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.