4.50 कोटींसाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर टाच

By Admin | Updated: April 28, 2016 00:15 IST2016-04-27T23:58:32+5:302016-04-28T00:15:54+5:30

ठेवी प्रकरण :१७ जून रोजी होणार लिला

Aim for Primary Education Department for 4.50 Crore | 4.50 कोटींसाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर टाच

4.50 कोटींसाठी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर टाच

नािशक : महापालिका शिक्षण मंडळाच्या साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी न मिळाल्याने प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या बोहरपट्टी येथील कार्यालयावर टाच आणण्यात आली असून, शिक्षण मंडळाने ही मिळकत लिलावात काढली आहे. त्यानुसार १६ जून रोजी लिलाव होणार आहे. अर्थात, महापालिकेची केवळ मुद्दल रक्कम वसूल होऊ शकेल; परंतु व्याजासह हीच रक्कम बारा कोटींच्या घरात असून उर्वरित रक्कम कशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक महापालिकेच्या विविध सहकारी बॅँकांमध्ये ठेवलेल्या ठेवी वसूल न झाल्याने अडचण निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ठेवी पालिकेला मिळालेल्या नाहीत, शिवाय महापालिका शिक्षण मंडळाच्या देखील साडेचार कोटी रुपयांच्या ठेवी अशाच प्रकारे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत अडकल्या आहेत. त्यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. महापालिकेची ४ कोटी ५७ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम थकली असून, व्याजासहीत ही रक्कम कैकपटीने अधिक आहे. महापालिकेच्या दाव्याच्या अनुषंगाने गहाण ठेवलेली ही रक्कम वसूल करण्यासाठी १६ जून रोजी लिलाव काढण्यात येणार असून, तशी नोटीसच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता १६ जून रोजी ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
महापालिकेने लिलाव करून वसुलीची तयारी सुरू केली असली तरी केवळ साडेचार कोटी रुपयांचाच विचार केला आहे, असे पालिकेतील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या पतसंस्थेकडे व्याजासह सुमारे साडेबारा कोटी रुपयांची देणी वसूल करणे बाकी असून, त्या पार्श्वभूमीवर केवळ एकाच कार्यालयाच्या लिलावातून ही रक्कम कशी काय वसूल होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Aim for Primary Education Department for 4.50 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.