शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवींचा चांदवडमधील रंगमहाल पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 07:03 IST

छपरे काढल्याने ऐतिहासिक ठेवा सडण्याच्या मार्गावर

महेश गुजराथी

चांदवड (जि. नाशिक): मल्हारराव होळकर यांनी चांदवड येथे रंगमहाल बांधला. या वाड्यातच पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उपराजधानी केली आणि चार महिने त्या येथेच मुक्कामी असत. या वाड्याची पडझड झाल्यामुळे पुरातत्त्व विभागामार्फत त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी एक दशक उलटले तरी हे काम झालेले नाही. मोठा निधी आला; मात्र पाहिजे तशी दुरुस्ती झाली नाही. दुरुस्तीच्या नावाखाली रंगमहाल पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चांदवडच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा रंगमहाल सन १७४० ते १७५७ या काळात बांधला गेला असावा. या महालाचे बुरूज आणि भिंती आता जीर्ण होऊन डागडुजीला आल्या आहेत. रंगमहालाचा मूळ ढाचा कायम ठेवून नूतनीकरणासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी सन २०१५मध्येच आला होता. सध्या नूतनीकरणाचे काम बंद आहे. रंगमहालात विविध २१ शासकीय कार्यालये सन १९९० पर्यंत कार्यरत होती. आता येथे केवळ मोकाट प्राण्यांचा मुक्तसंचार होत आहे.

रेणुकादेवी मंदिरापर्यंत भुयार 

चांदवडच्या रंगमहालापासून गावाबाहेर असलेल्या रेणुकादेवी मंदिरापर्यंत भुयार खणण्यात आले आहे. या भुयारातून अहिल्यादेवी या रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जात येत असत. मात्र, कालांतराने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जन्मसोहळा जामखेड (जि. अहिल्यानगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी (ता. जामखेड) येथे त्रिशताब्दी जन्मसोहळा उत्सव उद्या, शनिवारी आयोजित करण्यात आला आहे. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिक