Agriculture Officer | कृषि अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल
कृषि अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांचे हाल

पांगरी :- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील इंडियन ओवरसीज बँक येथे सुमारे सहा महिन्यापासून कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होऊन अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून येथे त्वरीत कृषी अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी येथे कृषी अधिकारी कार्यरत होते. परंतु अचानक त्यांची बद्दली करण्यात आली. येथे दुसरा अधिकारी येईल असे वाटत असताना सहा महिने उलटूनही अद्यापही येथे कृषी अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांना कर्ज जुने नवी करून घेण्यास अडचण तसेच नवीन कर्ज, पिक कर्ज, कर्ज माफी झाली आहे. परंतु त्या योजनेत कोण बसला कोण नाही तसेच, पिक विमा घेतलेले आहे त्याची चौकशीसाठी अधिकारी नसल्याने माहिती मिळत नाही. असे अनेक अडचणी सामना करवा लागतो तरी येथे त्विरत कृषीधिकारी ची नेमणूक करण्याची मागणी पंचायत समतिी सदस्य रवी पगार, सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, संजय वारूळे, संदीप शिंदे, विठ्ठल पगार, आदीसह शेतकºयांनी केली आहे.


Web Title: Agriculture Officer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.