कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

By Admin | Updated: September 3, 2014 00:34 IST2014-09-03T00:34:51+5:302014-09-03T00:34:51+5:30

कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

The Agriculture Officer was caught taking bribes | कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले


नाशिक : तपासणी अहवालावरील स्वाक्षरीसाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती घेणारे जळगाव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पवन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा लावून रंगेहाथ पकडले़
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराकडे सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रखते उत्पादनाचा परवाना आहे़ त्यांना दुय्यम अन्नद्रव्य मिश्रखत उत्पादनाचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी पुणे येथील कृषी आयुक्तालयात पत्रव्यवहार केला
आहे़
कृषी आयुक्तालयाने तक्रारदाराकडे परवान्यासाठी कृषी विकास अधिकाऱ्यांच्या उत्पादन स्थळ तपासणी अहवालाची मागणी केली़ त्यानुसार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पवन निंबा पाटील यांनी उत्पादन स्थळाची पाहणी केली; मात्र अहवालावर स्वाक्षरी केली नाही़





या तपासणी अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी कृषी अधिकारी पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जळगाव येथील शासकीय विश्रामगृह पद्मालय येथे तक्रारदाराकडून दहा हजार रुपये घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांना रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी कृषी अधिकारी पवन पाटील यांच्यावर जळगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: The Agriculture Officer was caught taking bribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.