कृषी पुरस्कारांचे बुधवारी वितरण

By Admin | Updated: June 27, 2015 00:26 IST2015-06-27T00:26:14+5:302015-06-27T00:26:14+5:30

कृषी पुरस्कारांचे बुधवारी वितरण

Agriculture Awards distribution on Wednesday | कृषी पुरस्कारांचे बुधवारी वितरण

कृषी पुरस्कारांचे बुधवारी वितरण

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठीचे पुरस्कार १ जुलै रोजी कृषिदिनानिमित्त सहा शेतकऱ्यांना या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी दिली. मागील वर्षीच आॅगस्ट २०१४ मध्ये या कृषी पुरस्कारांची घोषणा झाली होती. त्यात वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार शरदराव पुंडलिकराव ढोकरे (दिंडोरी) शेतीनिष्ठ - उल्हास बहिरू जाधव (शेणीत, इगतपुरी), शेतीनिष्ठ - दिलीप जेजीराम सूर्यवंशी (केळझर, बागलाण), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) सदाशिव वामनराव शेळके (येवला), उद्यान पंडित - सुरेश काशीनाथ कदम (येवला) व शेतीनिष्ठ दत्तू राजाराम ढगे (बेलगाव ढगा, नाशिक) आदि सहा शेतकऱ्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ते या १ जुलै २०१५ रोजी कृषिदिनानिमित्त एका कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Agriculture Awards distribution on Wednesday