शेतीमालाचे भाव कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:34 IST2018-08-27T16:34:01+5:302018-08-27T16:34:31+5:30
सायखेडा: खरीप हंगामातील नगदी पीक शेतातून काढणीला आले असले तरी फळभाज्या आ िणपालेभाज्या यांची विक्र ी कवडीमोल भावाने होत आहे.पिकांसाठी केलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे

शेतीमालाचे भाव कोसळले
पालेभाज्या कवडीमोल :खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर
सायखेडा:
खरीप हंगामातील नगदी पीक शेतातून काढणीला आले असले तरी फळभाज्या आ िणपालेभाज्या यांची विक्र ी कवडीमोल भावाने होत आहे.पिकांसाठी केलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे
जून महिन्यात लागवड करण्यात आलेले टमाटे, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, दोडका काकडी, वांगी ,यासह कोथंबीर,शेपू, पालक,मेथी यासारख्या पालेभाज्या कवडीमोल भावात जात आहे पालेभाज्या कवडीमोल भावात जात असल्याने खर्च वसूल होत नाही त्यामुळे शेतकº्यांनी भाजी विक्र ीसाठी न्यायची बंद केली आहे. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या सोडून दिल्या आहेत. बियाणे, खुरपणी,खते, औषध फवारणी यासाठी आलेला खर्च वसूल होत नाही
हंगामाच्या सुरवातीलाच टमाटे दोन अंकी भावात विक्र ी होत आहे त्यामुळे ८० ते ९०रूपयेभावाने तोडणीचा आ िणवाहतूक खर्च वसूल होत नाही पिकासाठी प्लॅस्टिक आच्छादन, तार, बांबू, बांधणीसाठी सुतळी, रासायनिक खते, फवारणीची औषधे ,मजुरी यासाठी झालेला खर्च खिशातून घालण्याची वेळ आली आहे.
कोणत्याच नगदी पिकांना भाव मिळत नसल्याने शेतात नेमके कोणते पीक घ्यावे आणि पिकासाठी खर्च करावा कि नाही अशी वेळ शेतकर्यांवर आली आहे बाजारात असा शेतीसोडून कोणताच व्यवसाय असा नाही की भांडवल खर्च करतांना ते वसूल होईल की नाही प्रत्येकाची विक्र ीची किंमत नक्की झालेली असते शेतीमाल असा आहे की त्याची विक्र ी केल्यानंतर किंमत शेतकर्यांना समजते त्यामुळे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर तोट्यात आहे 10 एकर जमीन असणार्या शेतकर्यांना कुटुंब खर्च भागविताना नाकी नऊ येत असल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे हंगामाच्या सुरवातीलाच कवडीमोल भाव मिळत असल्याने वर्ष तोट्यात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ,
शेतीमालाच्या आधारभूत किंमतीची शासन केवळ घोषणा करते मात्र त्या पिकांना मातीमोल भावात विक्र ी करावी लागते अशा वेळी शासन दरबारी कोणताही निर्णय घेतला जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे
आजचे बाजार भाव(प्रतिकिलो)
टमाटे: ४ रूपये
कोबी: २ रूपये
फ्लॉवर :२ रूपये
भाज्या(एकजुडी)
कोथंबीर: २ रूपये
शेपू:२ रूपये
मेथी:५ रूपये
पालक:३ रूपये
शेतीमालाला आज हंगामाच्या सुरवातीलाच कवडीमोल भाव मिळत आहे टमाटे, कोबी,फ्लॉवर, पालेभाज्या आज कवडीमोल भावात विकिली जात आहे पीक उभे करण्यासाठी घातलेले भांडवल तर सोडाच पण पीक शेतातून बाजारात विक्र ीसाठी नेण्याचा खर्च सुद्दा वसूल होत नाही यासारखे दुर्दैव काय?
सुदाम खालकर
शेतकरी, औरंगपूर