भाजीपाला पुरवठ्यासाठी सरसावला कृषी विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:16 PM2020-04-02T17:16:11+5:302020-04-02T17:16:47+5:30

आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे.

Agricultural department for supply of vegetables | भाजीपाला पुरवठ्यासाठी सरसावला कृषी विभाग

नाशिक शहरात भाजीपाला विक्र ी करताना जय भद्रा कृषी विज्ञान मंडळाचे सदस्य.

Next

जळगाव नेऊर : आज संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला असून, देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. दररोजच्या आहारातील भाजीपाला पुरवठा कमी होऊ नये, यासाठी कृषी विभागही सरसावला आहे.
कृषी आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार, येवला कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक यांनी आपापल्या सजेतील शेतकरी बांधवांनी पिकविलेला भाजीपाला शहरी भागात विकण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी सहायक साईनाथ कालेकर यांनी माहिती संकलित करून कृषी उत्पादक गटामार्फत सदर भाजीपाल्याची शहरांमध्ये एक दोन व्यक्तींनी जाऊन विक्र ी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना भांडवल मिळू लागले आहे. जय भद्रा कृषी विज्ञान मंडळामार्फत अध्यक्ष ज्ञानेश्वर पगार यांनी व कृषी सहायक साईनाथ कालेकर यांनी भाजीपाला पुरवठा सुरू केला आहे.

आजमितीस मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम द्राक्षबागा उभ्या आहेत; पण व्यापारी खरेदी करत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांना आधार म्हणून कृषी विभाग येवला येथील सर्व कर्मचारी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर द्राक्ष खरेदीसाठी जाहिरात करत असून, स्वत:कडे आॅर्डर नोंदवून विक्र ी करण्यासाठी मदत करत आहे. आजपर्यंत येवल्यात दहा क्विंटलपेक्षा जास्त द्राक्ष विक्र ी करून शेतकरी बांधवांना हातभार लावला आहे.
- साईनाथ कालेकर, कृषी सहायक, पिंपळगाव लेप.
कोट
उन्हाळ्यात भाजीपाल्या चांगला दर असतो यादृष्टीने शेतात भाजीपाला पिकवला; पण कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाला वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. कृषी विभागाच्या परवानगीने शहरात भाजीपाला विक्र ी करून चार पैसे पदरात पडत असल्याने होणारे नुकसान टळले.
- ज्ञानेश्वर पगार, अध्यक्ष, जय भद्रा कृषी विज्ञान मंडळ

Web Title: Agricultural department for supply of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app