आहेरगाव येथे कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम

By Admin | Updated: June 29, 2014 00:59 IST2014-06-27T21:41:29+5:302014-06-29T00:59:35+5:30

पिंपळगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत क. का. वाघ कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात आहेरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्यांची पहाणी करून प्रात्याक्षित सादर केले.

Agricultural Demonstration Program at Heygaon | आहेरगाव येथे कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम

आहेरगाव येथे कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम

पिंपळगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत क. का. वाघ कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात आहेरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्यांची पहाणी करून प्रात्याक्षित सादर केले. तसेच शेततळ्याबाबत आधुनिक युगात महत्त्व पटवून दिले.आहेरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेततळे उभारली आहे. कृषितज्ज्ञांनी शेततळ्याबाबत शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेततळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. यावेळी सागर वाघ, सागर पवार, दिवराज निकुंभे, गजानन मराठे, संतोष कुमरकर, प्रशांत वखरे, अमित खांदे आदी सहभागी होते. यावेळी प्रा. टी. बी. उगले, प्रा. बी. बी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Web Title: Agricultural Demonstration Program at Heygaon