चांदवड पंचायत समितीत कृषिदिन

By Admin | Updated: July 4, 2014 00:24 IST2014-07-03T21:54:06+5:302014-07-04T00:24:59+5:30

चांदवड पंचायत समितीत कृषिदिन n

Agricultural Day in Chandwad Panchayat Samiti | चांदवड पंचायत समितीत कृषिदिन

चांदवड पंचायत समितीत कृषिदिन


चांदवड : चांदवड पंचायत समिती कृषिदिन अर्थात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपसभापती अनिल काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, कृषी अधिकारी संदीप मोगल, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, कृषी अधिकारी विजय पवार, पी. के. आव्हाड आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी कृषी खात्याने पाणी योजनांचे नियोजन करावे तर पाणी अडवा, पाणी जिरवा या योजना राबवून दुष्काळी तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा असे
सांगितले.
राजकीय नेते व कार्यकर्ते यांनी कृषिदिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या उपयोगी योजना अंमलात आणावीत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झालीत. कार्यक्रमास डी. ओ पवार, सी. आर. सोनवणे, डी. सी. जाधव, पी. सी. जाधव, डी. बी. देवरे, पी. ए. निरभवणे, कांबळे, ए. आर. घुमरे, सरोदे, खैरनार आदिंसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Agricultural Day in Chandwad Panchayat Samiti